Sindewahi : जयस्वाल यांच्या ओपन स्पेस शेजारी नालीचे बांधकाम करा.

0

परीसरातील नागरीकांचे नगराध्यक्ष कावळेंना निवेदन.
SINDEWAHI | 18 MAY 2024
शहरातील त्रिवेणीनगर वार्ड क्र. ०१ परीसरातील चंदू जयस्वाल यांच्या ओपन स्पेसमधील सांडपाणी वाहता होऊन पाण्याचा निचरा होण्यासाठी याठिकाणी श्री. चंद्रगीरीवार यांचे घरापासून ते प्राजक्ता कान्वेंटपर्यंत नालीचे बांधकाम करा, अशी मागणी परीसरात राहणाऱ्या नागरिकांनी नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. 


त्रिवेणीनगरातील वार्ड क्र. ०१ मध्ये चंदू जयस्वाल यांच्या ओपन स्पेसमध्ये आजूबाजूच्या घरांतून निघणारा सांडपाणी मागील अनेक दिवसांपासून साचून आहे. या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होत नसल्याने दुषित पाण्याचे मोठे डबके तयार झाले आहे. याठिकाणी सांडपाणी निघून जाण्यासाठी कोणत्याही नालीची व्यवस्था नाही, त्यामुळे सांडपाणी पुढील नागरी रहदारीच्या रस्तावर आला आहे आणि पाण्याचा उग्र वास येऊ लागल्याने परीसरातील नागरीकांना त्याचा भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना नाक दाबून वहिवाट करावी लागत आहे. यासोबतच नगरपंचायत प्रशासनाकडून या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने या परीसरात डासांची व विषारी कीटकांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे. या दुषित सांडपाण्यामुळे परीसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर याठिकाणी श्री. चंद्रगीरीवार यांचे घरापासून ते प्राजक्ता कान्वेंटपर्यंत नालीचे बांधकाम करा, अशी मागणी परीसरातील नागरीकांनी नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांच्याकडे निवेदन देत केली आहे. 

याचसोबत दि. ११ डिसेंबर २०२३ ला परीसरातील नागरिकांनी स्वाक्षरीसह मुख्याधिकारी तसेच स्थानिक नगरसेवक यांचेकडे निवेदनही दिले होते. परंतु सहा महिने उलटूनही याकडे नपं. प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. अशी निराशाही निवेदनकर्त्यांनी यावेळी बोलून दाखविली.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात दिलीप वरगंटीवार, सतीश निकोडे, श्री. चंद्रगीरीवार, कोमेश राखडे व राहुल कावळे यांचा समावेश होता. Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !