Bramhapuri : माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांचा भानारकर कुटुंबियांना मदतीचा हात.

0

BRAMHAPURI | 15 MAY 2024
७ मे रोजी ब्रह्मपुरी तालुक्यातील उदापूर येथील महानंदा भानारकर या महिलेचे पूर्ण कुटुंब चौगान येथे लग्न कार्य साठी गेले होते. या दरम्यान दुपारी १२ वाजताच्या सुमारास त्यांच्या घराला आग लागल्याची माहिती उदापूर येथील नागरिकांनी त्यांना कळवली. या वेळेत गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आग आटोक्यात आली तोवर भानारकर कुटुंबियांच्या सर्व जीवन उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या. यामुळे भानारकर कुटुंबाचे फार मोठे नुकसान झाले असून पूर्ण कुटुंब रस्त्यावर आले आहे.

या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टीचे नेते व ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्तिथीची पाहणी केली व भानरकर कुटुंबियांना आर्थिक निधी व जीवनावश्यक वस्तू देत मदतीचा हात दिला.  


सोबतच शासनाच्या वतीने अन्न धान्य पुरविणाच्या सूचना माजी आमदार देशकर यांनी प्रशासनाला दिल्या. व मुख्यमंत्री साह्ययता निधी मधुन मदत करण्याचे आश्वासन सुद्धा माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांनी भानारकर कुटुंबियांना दिले.

याप्रसंगी भाजपा ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रेमलालजी धोटे, भाजपा ओबीसी आघाडीचे शहर अध्यक्ष प्रा. अशोक सालोटकर, प्रा. चंद्रकांत विटाळकर, प्रा. संजय लांबे, उदापुर भारतीय जनता पक्षाचे सुभाष नाकतोडे, अनिल नाकतोडे, पवन बेदरे, तुळशीदास राऊत, मनोहर नाकतोडे, गोकुळ नागदेवते यांच्या सह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !