Chandrapur : भाऊ कोट्याधीश तर वहिनी अब्जोपती!
March 29, 2024
0
CHANDRAPUR | 29 MARCH 2024
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदासंघासाठी बुधवारी (दि. २७) नामनिर्देशन प्रक्रिया पुर्ण झाली. यात 36 उमेदवारानी त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेची माहिती शपथपत्रात विषद करीत 48 अर्ज दाखल केले आहेत. महाविकास आघाडी MVA (काँग्रेस) च्या उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांच्या शपथपत्रानुसार त्यांच्याजवळ 1352088982.82 (1अब्ज 35 कोटी 20 लाख 88 हजार 982 किंमतीची मालमत्ता आहे तर महायुती (भाजपा) चे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या कडे 1कोटी 48 लाख 7 हजार 405 रुपयाची मालमत्ता आहे.
आता ही माहिती निवडणुक आयोगाने सार्वजनिक केल्याने 'भाऊ कोट्याधीश तर वहिनी अब्जोपती' असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार यांच्यावर विविध वित्तीय संस्थांचे 55. 23 कोटींचे कर्ज आहे. मर्सिडीज बेंझ, ऑडी, फॉर्चुनर, किया, सेल्टोस, होंडा, बिआरव्ही आणि 3 दुचाकींचा समावेश आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न 49.85 लाख आहे दिवंगत पती बाळू उर्फ सुरेश धानोरकर (Balubhau Dhanorkar) यांचे वार्षिक उत्पन्न 72.29 लाख रुपये होते. त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत शेती आणि व्यवसाय आहे. त्यांच्याकडे 25.15 लाख रुपये रोख रक्कम आहे. तर त्यांच्या कुटुंबाकडे 50 हजार रोख रक्कम आहे आणि त्यांच्या सर्व बँक शाखांमध्ये ठेवी आहेत. त्यांच्या नावावर 272 ग्रॅम सोने असून त्यांच्या कुटुंबीयांकडे अनुक्रमे 205 ग्रॅम सोने आहे. त्याची एकूण किंमत 57.60 लाख रूपये आहे. धानोरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे जिल्ह्यात 28 ठिकाणी शेतजमीन आहे. 26 ठिकाणी बिगरशेत जमीन आहे.
महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विविध वित्तीय संस्थांचे एकूण 4.51 कोटींचे कर्ज आहे. त्यांच्या नावावर एकूण 1.42 कोटींचे गृहकर्ज आहे. तसेच बंगल्याच्या इंटिरिअरसाठी 43.37 लाखाचे कर्जही घेतले आहे. मुनगंटीवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. त्यानुसार, नावावर किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर कोणतेही वाहन नोंदणीकृत नसल्याने त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न 49.82 लाख रुपये आहे. तर त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न 4.90 लाख आहे. जागा आणि इमारतीचे भाडे आणि विधानसभा सदस्य म्हणून मिळणारे मानधन हे त्यांच्या उत्पन्नचे साधन आहे. त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे फक्त 90 हजार रुपये रोख आहेत. तर पत्नी सपना मुनगंटीवार यांच्याकडे 46 हजार रोख रक्कम आहे. मुनगंटीवारांच्या नावावर 200 आणि सपना मुनगंटीवारांच्या नावावर 500 ग्रॅम सोने आहेत. दाताळा कॉम्प्लेक्समध्ये 2.13 एकर शेतजमीन असून त्याची किंमत 18.98 लाख आहे. तर पत्नीकडे वडगाव येथे 1.57 एकर शेतजमीन जी 2.57 कोटीची आहे. याशिवाय दाताळा, भानापेठ, बल्लारपूर, रयतवारी, वडगाव येथे कुटुंबियांच्या नावे बिगरशेत जमीन आहे. त्यांच्याकडे 7.95 कोटींची वडिलोपार्जित आणि स्वतःच्या मालकीची मालमत्ता असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
Tags