Gondpipari: गुरूवारी गोंडपिपरीत नाभिक समाज वधु-वर परिचय मेळावा

0


नाभिक एकता रंगमंचाकडून होणार 'बंधन' नाटकाचे आयोजन.

GONDPIPARI । 15 JANUARY 2024
येत्या गुरुवारी (दि.१८) तालुका नाभिक समाज संघटनेच्या वतीने शहरातील कन्यका सभागृहात समाज मेळावा तसेच वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून दिलिप रामगिरवार तर अध्यक्षस्थानी नंदकिशोर पंदिलवार उपस्थित राहणार आहेत. यासोबतच उपाध्यक्ष म्हणून संतोष अतकरे, सहउद्घाटक मधुकर जनपल्लीवार मारोती घुमे, प्रकाश सुर्वे, श्रीधर जेट्टीवार, घनश्याम दयालवार, लिलाधर सुत्रपवार, नामदेव दयालवार, ॲड. रामभाऊ देवईकर, अरूण पालीकोंडावार, दिलीप मादेशवार, रविंद्र येसेकर, मनोहर कुद्रपवार, देवेंद्र वाटेकर, योगेश जेट्टीवार हे प्रामुख्याने उपस्थित रहाणार असून डॉ. गुरूदास येडेवार आणि आकाश कडूकर यांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. 


समाज बांधवांचा संघटीत स्नेहमिलन व्हावा तसेच समाजातील नववर-वधूंना विवाहयोग्य व अनुरूप स्थळ योग्यरीत्या मिळावा या उद्देशाने या भव्य वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. तरी गोंडपिपरी तालुक्यासह परीसरातील नाभिक समाज बांधवांनी होणाऱ्या मेळाव्याला तसेच शहरात नाभिक समाज भवनाच्या मदतीकरीता ठेवलेल्या 'बंधन' या नाट्यप्रयोगाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन नाभिक समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. 


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !