विविध शासकीय योजनांची गावकऱ्यांना माहीती
SINDEWAHI । 14 JANUARY 2024
तालुक्यातील गुंजेवाही येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकाभिमुख संकल्पनेतून संपुर्ण देशभर फिरणाऱ्या विकसित भारत संकल्प रथयात्रेचे आज (दि. १४) आगमन झाले.
या रथयात्रेचे शालेय विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने गावकऱ्यांसह जंगी स्वागत केले. यावेळी सरपंच वसंत टेकाम, वैद्यकीय अधिकारी डॉ.पत्रे, भूमी अभिलेख विभागाचे निखार, सहाय्यक पशूधन विकास अधिकारी डॉ. वाघरे, कृषी सहाय्यक खनकर, ग्रा. पं. सदस्य पूनेश गांडलेवार, चंद्रकांत मोहुर्ले, होमकांत वालदे, आशा वाडगुरे, छाया कोडापे, पोलीस पाटील वंदना चन्ने, पोलीस पाटील शोभा भेंडारे, मनोज चन्ने, सुरेश गुणशेट्टीवार, जि. प. हायस्कूलचे मुख्याध्यापक विनोद कोवे, बोंद्रे, यामिना वालदे, घोनमोडे आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून डबल इंजीनच्या वेगाने सुरू असलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांचे समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत लाभ पोहचविण्यासाठी शासन व प्रशासनाने विषेश परीश्रम घ्यावे तसेच गोरगरिब जनतेला या योजनांनी माहीती द्यावी. यासोबतच नागरीकांनीही याठिकाणी मिळणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा, प्रत्येक नागरीकाने २०४७ च्या विकसित भारताच्या संकल्पपुर्तीसाठी या अभियानाशी जुळून स्वत: अॅम्बेसिडर व्हावे. असे आवाहन याप्रसंगी दृकश्राव्य माध्यमातून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांचे हे मार्गदर्शन गावकऱ्यांनी सामुहिकरीत्या श्रवले. त्यानंतर विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वरूप, केंद्र सरकारच्या योजना व त्यांचे उद्देश वाचन करुन दाखवत संबंधित अधिकाऱ्यांनी आपआपल्या विभागाचे कार्य व योजना बाबत गावकऱ्यांना माहिती दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्थाविक ग्रामविकास अधिकारी लांजेवार संचालन सहाय्यक शिक्षक गायकवाड तर आभार आरोग्य केंद्राचे परीचर आकाश मोगरे यांनी मानले.