eyecamp : प्राथमिक आरोग्य केंद्र गुंजेवाही येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर.

0


SINDEWAHI । 27 December 2023
तालुक्यातील गुंजेवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काल (दि. २६) मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबीराला नागरीकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


आरोग्य विभाग,जि.प.चंद्रपूर तथा अवंती ऑप्टिकल, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रा. आ. केंद्र, गुंजेवाही येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिर संपन्न झाले.यावेळी २५०-३०० नागरिकांनी नेत्र तपासणी केलेली आहे तर २५० लोकांना चष्मे वाटप झाले.
या सेवाभावी शिबिराचे उदघाटन सरपंच वसंत जी टेकाम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी गुंजेवाही प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ममता पत्रे, ग्रामपंचायत सदस्य तसेच जन आरोग्य समिती सदस्य पुनेश गांडलेवार,ग्रा.पं.सदस्य सादिक शेख,जन आरोग्य समिती सदस्य रोशन कोरेवार यांच्या हस्ते रिबीन कापून मोफत डोळे तपासणी शिबिराला सुरवात करण्यात आली.


शिबिर यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी श्री. रमनलाल बेदरे, आ. सहा, ललिता कोसमशिले, आ. सहा(स्त्री.) प्रफुल वाकडे,क. सहा, वैशाली राऊत,आ. सेविका, आकाश मोगरे व त्याचप्रमाणे आशा स्वयंसेविका मंगला मुत्तेलवार, निलिमा रामटेके, अविषा कुळमेथे यांचेसह बहुसंंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !