Sindewahi : वहाबअली सय्यद राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्काराने सम्मानित.

0


SINDEWAHI। 24 DECEMBER 2023
येथील निर्भीड पत्रकार म्हणून सुपरिचित असलेले वहाबअली सय्यद यांना ऑल जर्नालिस्ट ॲड फ्रेंडस सर्कल च्या वतीने राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार-२०२३ देऊन नुकतेच गौरविण्यात आले. 




नांदेड येथील पीपल्स कॉलेजच्या नरहर कुरुंदकर सभागृहात २४ डिसेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात वरीष्ठ पत्रकार अजीत देसाई, माहीती व जनसंपर्क संचालनालयाचे माजी संचालक देवेंद्र भुजबळ यांच्या हस्ते सय्यद यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
यावेळी ऑल जर्नालिस्ट ॲड फ्रेंड्स सर्कलचे कार्यवाह बाळकृष्ण कासार, अध्यक्ष गणेश कोळी, जिल्हाध्यक्ष साहेबराव बेळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

सामाजिक भान ठेवून उत्तम पत्रकारीता करीत असल्याने या राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराचे मानकरी ठरल्यावर वहाबली सय्यद यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !