tukdoji maharaj : गुंजेवाही येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगे बाबा पुण्यस्मरण सोहळा संपन्न.

0


SINDEWAHI । 29 DECEMBER 2023
तालुक्यातील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुंजेवाही च्या वतीने दि. २७ ते २८ डिसेंबर दरम्यान आयोजित केलेल्या ब्रम्हलीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५५ व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांचा ६७ वा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दि. २७ डिसेंबर रोजी राजेंद्र गुनशेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात ह. भ. प. तुकारामजी बुरबांदे महाराज यांचे हस्ते घटस्थापना तर तलाठी नागपुरे यांचे हस्ते झेंडावंदन करून पुण्यस्मरण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
यावेळी सरपंच वसंत टेकाम, उपसरपंच शालीनी गुरनूले, मनोज चन्ने, विजय सुरपाम, दिनाजी बावणे, शंकर निषाद, ग्रामविकास अधिकारी लांजेवार, पो. पा. वंदना चन्ने, पो. पा शोभा भेंडारे, डॉ. ममता पत्रे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


त्यानंतर च्या सत्रात माँ अंबिका महिला भजन मंडळ तांबेगडी मेंढा, गुरुदेव सेवा भजन मंडळ अंबिकानगर, कृष्णा महिला भजन मंडळ, सत्संग भजन मंडळ आणि गुरुदेव सेवा भजन मंडळ टेकरी यांच्या सामुहिक भजनसंध्येचा कार्यक्रम घेण्यात आला. स्व. सुधाकरराव चन्ने यांचे स्मृतीप्रित्यर्थ श्रीमती कांताबाई चन्ने यांचे कडून किर्तनकार ह.भ.प. जयश्री गावतुरे यांचा जाहीर किर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.



दुसऱ्या दिवशी पहाटे सामुहिक ग्रामस्वच्छता आणि सामुदायिक ध्यानपाठ करण्यात आले. त्यानंतर सकाळी सातच्या सुमारास दिनाजी बावणे व गणपत कोहळे यांच्या भजन मंडळ संचाच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक काढण्यात आली.


समारोपीय कार्यक्रमात दुपारी दोन वाजता ह.भ.प. सुनंदा खुशाल बोरकर सिंदेवाही यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनात गोपालकाला पार पडला, त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना सामुहिक मौन श्रद्धाजंली वाहून या सोहळ्याची सांगता झाली.
या कार्यक्रमाला ग्रामवासीयांसह परीसरातील नागरीकांची मोठी उपस्थिती होती. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !