SINDEWAHI : २० लाखांची खंडणीचे आरोप बिनबुडाचे!

0

सरपंच राहुल बोडणे नवरगाव यांचे पत्रकार परिषद मध्ये खुलासा

SINDEWAHI । 8 September 2023
सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील शेतीच्या जमिनीबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यानां चुकीची माहिती सांगून रस्त्यासाठी आदेश करून घेतला. ही माहिती सरपंच राहुल बोडणे यांना होताच त्या जागेवर आक्षेप घेतला. तेव्हा षडयंत्र रचून २० लाखाची खंडणी मागितल्याचा आरोप राजू भैसारे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर प्रतिउत्तर म्हणून आज दिनांक ०८/०९/२०२३ ला ग्रामपंचायत कार्यालय नवरगाव येथे पत्रकार परिषद घेऊन लावलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे खंडण करून खुलासा केला आहे.

या जागे संदर्भात माहिती देताना मौजा रत्नापूर सर्वे नंबर ९८३/१ या शेत जमिनीचे मूळ मालक धर्मानंद नागदेवते व लता देवेंद्र नागदेवते रा. रत्नापूर यांच्याकडून ती शेतजमीन घेतली होती. त्या जमिनीचे संपूर्ण कागदपत्रे स्वतः च्या नावे केली आहे. हे सत्यता आहे. त्यांनी त्या शेतात ये - जा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता नसल्याने तहसीलदार सिंदेवाही यांना रीतसर अर्ज करून रस्ता करून देण्याची मागणी केली. या अर्जाची दखल घेऊन नायब तहसीलदार धात्रक, मंडळ अधिकारी नवरगाव व आकरे तलाठी रत्नापूर यांनी चौकशी करून सरकारी जागेमधून उत्तर -दक्षिण ८फूट आणि दक्षिण च्या टोकापासून रस्ता अंशता मंजूर करून दिनांक २७/१२/२०२२दिला. परंतु ती जागा मौजा नवरगाव भू. क्रं १९या हद्दीत असून सरकार, झुडुप कुरण साठी आरक्षित आहे.ही जागा महसूल विभागाची असल्याने त्याजागेची हद्द नवरगावची साजा असताना देखील परवानगी साठी कागदपत्रे घेतले नाही. म्हणून या जागेवर नवरगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिनांक ०३/०१/२०२२ ला तहसीलदार सिंदेवाही यांना अनधिकृत रस्ता काढल्याबाबत निवेदन देण्यात आले. त्या निवेदनाचा कारवाई अहवाल, उपअधिक्षक, भूमिअभिलेख सिंदेवाही तहसीलदार यांनी दिलेला पत्र, मोजणीची नोटीस, मोजणीचे पत्र व क शीट जोडून दिले. तसेच राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री, सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री चंद्रपूर, नगररचनाकार व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना सुद्धा निवेदन दिले. तेव्हा गणेश जगदाळे तहसीलदार सिंदेवाही यांनी यांनी दिनांक ०४/०१/२०२३ ला आदेश देऊन स्पष्ट आदेशात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ अन्वये दिनांक २७/१२/२०२३ ला पारित आदेश रद्द करून ती शासकीय जमीन असल्याने कोणताही रस्ता बनवून कृत्य करू नये. केल्यास दंडात्मकतसेच फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल असे आदेशात म्हटले आहे. यामध्ये माझा काहीही तिळमात्र संबंध नाही.व अधिकार नाही.राजू भैसारे यांनी ग्रामपंचायत ठराव घेऊन व राजकीय हस्तक्षेप करून तहसीलदाराने मंजूर केलेला रस्त्याचा आदेश रद्द करून नोटीस दिली नाही.आणि त्याच आदेशाची प्रत घेऊन माझ्या कार्यालयात येऊन खंडणीची मागणी केला. हे खोटे आहे मी गेलोच नाही.अश्या स्पष्ट शब्दात इन्कार केला.


तहसीलदार सिंदेवाही यांनी रस्त्याबाबत केलेला आदेश रद्द करण्याचा सैविधानिक अधिकार मला संविधानाने दिला नाही.तेव्हा २०लाख रुपये मागण्याचा प्रश्न येतोच कुठून? त्याची जागा ग्रामपंचायतच्या अख्त्यारीत येत नाही.त्या जागेवर ग्रामपंचायत चा कोणताही अधिकार नाही. तेव्हा ठराव घेण्याचा,पदाचा दुरुपयोग करून राजकारण करण्याचा आणि खंडणी मागण्याचा प्रश्न येतोच कुठून त्यांनी केलेल्या सर्व बेमुनाद आरोपाचे खंडन करून मला एका पक्षाचा कार्यकर्ता व माझी समाजात असलेली प्रतिष्ठा बदनामी व्हावी हा दुष्टिकोन ठेऊन षडयंत्र रचित असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सुतोवाच केला. 
या सर्व बाबीचा खंडण करताना माझ्या विरोधात षडयंत्र रचून चुकीचे आरोप करून बदनामी केली आहे. त्यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा टाकणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !