SINDEWAHI हत्तीच्या अचानक एन्ट्रीने शेतकरी भयभीत!

0

मरेगाव बिटात येताचं, शेतपिकांची मोठी नुकसान..
SINDEWAHI । 14 SEPTEMBER 2023
ब्रम्हपुरी वनविभागातील सिंदेवाही वनपरीक्षेत्रात नागरीकांना पट्टेदार वाघं, बिबट व अन्य वन्यप्राण्यांचे दर्शन होणे यासोबतच अधूनमधून जंगली श्वापदांकडून अनुचित घटना घडणे हा प्रकार काही स्थानिकांना नविन नाही. परंतू आज (दि. १४ सप्टेंबर) सायंकाळी ०५ च्या सुमारास तांबेगडी मेंढा उपक्षेत्रातील मरेगाव बीटामधील खैरीचक (गुंजेवाही) शेतपरीसरात अचानक जंगली हत्ती दिसल्याने शेतकरी चांगलेच भयभीत झाले आहेत. 


सदर बीटालाच लागून असलेल्या अरूण शंकर गुणशेट्टीवार यांच्या (गट क्रमांक१६८,२०२,२०३,२०४,२०५,२०६) या शेतपरीसरात या हत्त्याने धुडगूस घालून शेतपिकाची चांगलीच नुकसान केली आहे. रानटी वन्यप्राण्यांच्या नुकसानीपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी लावलेल्या लोखंडी तारेच्या जाळ्यांची मोडतोड करून शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन, धान व मका पिकाला हत्त्याने पायदळी तुडवून नुकसान केली आहे. त्यामुळे वनविभागाने वेळीच लक्ष घालून सदर हत्त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परीसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 


घटनाक्रमाची माहीती घेण्यासाठी स्थानिक शेतकरी अरूण गुणशेट्टीवार यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात वनविभागाला कळविले असल्याचे सांगितले. परंतू सिंदेवाही वनपरीक्षेत्र अधिकारी सालकर आणि उपक्षेत्र अधिकारी बुरांडे यांनी सदर घटनेसंदर्भातील गांभीर्य लक्षात न घेता उडवाउडवीची उत्तरे दिल्याची माहिती ही त्यांनी दिली. 


त्यामुळे येत्या काळात वनविभागाने या हत्तीच्या अशा अचानक एन्ट्रीची गांभीर्याने दखल घेऊन हत्तीचा बंदोबस्त करावा आणि हत्तीने केलेल्या नुकसानीचा पंचनामा करत योग्य मोबदला द्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !