Madhuri Dixit : सिनेअभिनेत्री माधुरी दीक्षित ला मातृशोक!

0


बॉलीवुडची धक-धक गर्ल, सीने अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने (Madhuri Dixit nene) हिच्यावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 
माधुरीची आई श्रीमती स्नेहलता दीक्षित (Snehlata Dixit) यांचं आज (रविवार) सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान निधन झाल्याचे वृत्त पुढे आले आहे. मृत्युसमयी त्या ९१ वर्षाच्या होत्या. 
अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या पार्थिवावर ०३:०० च्या सुमारास मुंबईतील वरळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
आईच्या निधनानंतर माधुरीने ही अंत्यसंस्काराबाबतचा संदेश समाजमाध्यामांवर दिला आहे. ‘माझी प्रेमळ आई स्नेहलता दीक्षित हीचं आज सकाळी दुःखद निधन झालं. मुंबईतील वैकुंठ धाम, डॉ. ई. मोझेस रोड, जिजामातानगर वरळी येथील स्मशानभूमीत दुपारी ०३ च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.’ असे तिने लिहिले आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !