Bike accident : दुचाकीस्वाराची धडक! एक ठार, एक जखमी

0


सिंदेवाही-मरेगाव रस्त्यावरील घटना.. 

SINDEWAHI । 22 MARCH 2023.
सिंदेवाही (Sindewahi) पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिंदेवाही-मरेगाव रस्त्यावरील चिंद्यादेवी चढाईवर दुचाकीच्या धडकेने एकाचा मृत्यू तर एकाला किरकोळ दुखापत झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. 


गुंजेवाही (Gunjewahi) येथील रामा शिवा नैताम (४९) असे मृतकाचे तर बाळकृष्ण वासुदेव टेकाम (५०) असे जखमीचे नाव आहे. 
प्राप्त माहितीनुसार, रामा शिवा नैताम व रफिक शेख हे दोघे इलेक्ट्रिकल्स दुकानाचे सामान आणण्यासाठी सिंदेवाही येथे गेले होते. परंतू परत येताना चिंद्यादेवीच्या चढाजवळ काही सामान पडल्याने रफिक शेख हा खाली पडलेले सामान उचलण्यास गेला, यावेळी अचानकपणे मागेहून सुसाट दुचाकीने येणार्‍या बाळकृष्ण टेकाम याने दुचाकीवर बसून असलेल्या रामा नैताम यास जोरदार धडक दिली. त्यातच रामाचा तोल गेल्याने तो जागीच पडून गंभीर जखमी झाला. याबरोबरच बाळकृष्ण टेकाम यालाही किरकोळ दुखापत झाली. 
या दुर्घटनेनंतर, रफिक शेख व बाळकृष्ण टेकाम या दोघांनीही जागीच गंभीर जखमी झालेल्या रामा नैतामला सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारासठी नेले. सदरहू घटनेची माहिती रामा याच्या कुटुंबीयांना ही कळविण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता रामा यास तातडीने चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलविण्यास सांगितले.
परंतू गंभीर जखमी असलेल्या रामावर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या नेहमीच्या धोरणानुसार दुर्लक्ष करीत उशीराने तपासणी केल्यामुळे दुर्दैवाने रामाची प्राणज्योत मालवली. त्यामुळे सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा निदर्शनास आला आहे. अशी भावना जनमानसातून व्यक्त होते आहे. 

या दुर्घटनेमध्ये घरात अठराविश्व दारीद्र्य असलेला कमवता पुरुषचं गेल्याने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेचा पुढील तपास सिंदेवाही पोलिस करीत असून या दुर्घटनेतील दुचाकींच्या माहीतीसाठी माध्यमकर्मींनी पोलीस ठाण्यात विचारणा केली असता सकाळपासून टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे या दुर्घटनेला दडपण्याचा तर प्रयत्न होत नाही ना? अशीही प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहे. 


#Sindewahi #Bike #accident

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !