Rahul gandhi : राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द!

0


मोदींवरील टीका भोवली.. कोर्टानंतर, संसदेचीही कारवाई


DELHI । 24 MARCH 2023
देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी पुढे आली असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gaandhi) यांची खासदारकी (Member of Parliament) रद्द करण्यात आली आहे. ते केरळ राज्यातील वायनाड (Wayanad) या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.


राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्या बाबतचे नोटीसही त्यांना पाठविण्यात आली आहे. अलीकडेच सुरत (suart) येथील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड सुनावला होता. त्यानंतर त्यांना लागलीच जामीन ही मिळाला. यासोबतच राहुल गांधींना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदतही दिल्या गेली होती. परंतू ही मुदत पूर्ण होण्यापूर्वीच राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. 

लोकसभा अध्यक्षांनी हा निर्णय घेतला असून यासंदर्भातील नोटिफिकेशन (Notification) सचिवालयाने काढले आहे. सचिव उत्पल कुमार सिंह यांच्या नावाने तसे पत्रही राहुल गांधी, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, राज्यसभा, निवडणूक आयोग आणि सर्व मंत्रालय/विभागांना पाठविण्यात आले आहे. सदरहू पत्रानुसार भारतीय संविधानातील लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मधील कलम 10 (1) (e) अन्वये राहुल गांधी यांची खासदारकी २३ मार्च २०२३ पासून रद्द करण्यात येत असल्याचे सांगितल्या गेले आहे.

माजी खासदार राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटक राज्यातील कोलार येथे जाहीर सभा घेतली होती. त्याठिकाणी त्यांनी मोदी या आडनावावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. त्यामुळे ही टीका त्यांना चांगलीच महाग पडल्याचे बोलले जात आहे. 

#RahulGandhi #Parliamentofindia #MP
Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !