BIG BREAKING : सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे!

0


▪️मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सकारात्मक निर्णय..


MUMBAI । 20 MARCH 2023
राज्यात मागील सात दिवसांपासुन शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेंशन योजना (Old Pension Scheme) लागू करण्यासोबतच अन्य काही मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यव्यापी संप (Strike) पुकारला होता. 
यामध्ये राज्यभरातील जवळपास १८ लाख कर्मचाऱ्यांचा समावेश होता. आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचेसह कर्मचारी शिष्टमंडळाच्या पार पडलेल्या सकारात्मक बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. अशी माहिती कर्मचारी संघटनेचे समन्वयक विश्वास काटकर यांनी माध्यमांना दिली. 


कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीला सरकारने तत्वता मान्यता दिल्याचे संपकऱ्यांच्या समन्वयकांकडून सांगण्यात आले. मागील ०७ दिवसांपासून संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेंशन योजना लागू करण्याची प्रमुख मागणी सरकारकडे केली होती. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आणि या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे बोलल्या जात आहे. जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी एका समितीमार्फत अभ्यास करण्यात येईल. असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्यामुळे आम्ही संपातून माघार घेत आहोत. उद्यापासून सर्व शाळा, रुग्णालये, सरकारी कार्यालयांतील कर्मचारी आपापल्या कर्तव्यावर रुजू होतील अशीही माहिती महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली. 


राज्यातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे शिक्षण, आरोग्य तसेच इतर प्रशासकीय सेवा ठप्प पडल्या होत्या. त्यामुळे जीवनावश्यक सुविधांवर मोठा परिणाम झाला. त्या कारणाने सरकारी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. काहींना तशा नोटीशीही प्राप्त झाल्या. मात्र या सर्व नोटीसा आता मागे घेतल्या जातील. यासोबतच शो कॉज नोटीसा देखील मागे घेतल्या जातील. असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. सात दिवसांच्या या रजा प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या खात्यातील रजांमध्ये गणल्या जातील, असेही काटकर यांनी सांगितले.


#Maharashtra #OldPensionScheme 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !