खा.शरदचंद्र पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्य जेष्ठ नागरिकांचा सत्कार.

0

चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्थानिक यंग रेस्टॉरंट हाॅलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन.

चंद्रपूर, दि. १३ डिसेंबर २०२२.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार शरदचंद्र पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्य चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमेटीच्या वतीने जिल्हाअध्यक्ष राजीव कक्कड यांच्या पुढारातून सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ८३ जेष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.
हा कार्यक्रम स्थानिक यंग रेस्टॉरंटच्या हॉलमध्ये काल संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी खासदार शरद पवारांच्या सामाजिक व राजकीय जिवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर अनेकांनी आपापले मनोगत याठिकाणी व्यक्त केले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलताना, जेष्ठ नेते बाबासाहेब वासाडे यांनी पवारांसोबतच्या आपल्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर युवक राकाँ.चे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर, जेष्ठ नेते हिराचंद बोरकुटे, ओ. बी.सी. सेलचे जिल्हाध्यक्ष आरिकर, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, शिभाताई पोटदुखे, महिला कार्याध्यक्ष चारुशिला बारसागडे, विनोद लाभणे, धनंजय दानव, किसनजी झाडे, युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे यांचेसह आदी मंडळी उपस्थित होते.
तसेच याठिकाणी सत्कार स्विकारणाऱ्या ८३ जेष्ठ नागरिकांमध्ये इंजि प्रदीप अडकीने,पत्रकार चंद्रगुप्त रायपुरे, वैशाली टोंगे, किशोर पोतनवार, माजी सैनिक अशोक कपूर, खत्री समाज अध्यक्ष किशोर कपूर, डॉ. दाभेरे, गोपाळराव सातपुते, शालीक भोयर, भैयाजी मुळेवार, रामप्यारे शर्मा, श्री. तऱ्हाणे, पठाण यांचेसह आदींचा समावेश होता.



या कार्यक्रमाचे संचालन विध्यार्थी अध्यक्ष कोमिल मडावी याने तर आभार शहर महासचिव धनंजय दानव यांनी मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !