🚑🚚ब्रह्मपुरीजवळ एकाच वेळेस दोन अपघात!🏍️

0


⭕💥ACCIDENT BREAKING!

ब्रम्हपुरी, दि. १३ डिसेंबर २०२२.
ब्रह्मपुरी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या उदापूरजवळील राईस मिलनजीक मूडजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयातून रुग्ण घेऊन गावी परतताना पारडगाव जवळील पेट्रोल पंपासमोर राष्ट्रीय महामार्गावर राईस मिलच्या जवळपास मध्य धुंद अवस्थेत असलेल्या रुग्णवाहिकाच्या चालकाने  उभ्या ट्रकला धडक दिल्याने काल सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला.
यात तीन रुग्ण गंभीरित्या जखमी असून त्यांना ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तर.... राष्ट्रीय महामार्गावरील किन्हीजवळ रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोटारसायकल स्वाराने आरमोरी वरून ब्रह्मपुरी मार्गे निघणाऱ्या कॅनलवर काम करणाऱ्या कॅम्परच्या मागच्या बाजूला बेधुंद अवस्थेत धडक दिल्याने तो किरकोळ जखमी झाला असून त्यालाही ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सदरहू मोटर सायकलस्वार हा आरसोडा येथील असल्याची विश्वासनीय माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
वृत्त लिहीस्तोवर कोणतीही मोठी जीवित हानी झाली नसल्याचे कळते.
या दोन्ही घटनांचा अधिक तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !