सिंदेवाही, दि. १२ डिसेंबर २०२२.
गडचिरोली तसेच चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरफोडी तसेच दुचाकी चोरी करण्याच्या तगादा लावलेला आणि जवळपास एका वर्षापासून फरार असलेला गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी शुभम प्रल्हाद शेंडे (२७) यास सिंदेवाही पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
अटकेत असलेला आरोपी नामे शुभम प्रल्हाद शेंडे याची सिंदेवाही पोलिसांनी ०३ दिवस पोलीस कोठडी घेतली असून आरोपीने दिलेल्या कबुली वरून सिंदेवाही परिसरातून चोरी केलेले १,८५,०००/- रूपयाचे सोन्याचे दागिने तसेच तीन मोटरसायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. एकुणच ३,१५,०००/- रुपये मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आला.
यासोबतच आरोपीकडून इतरही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून त्यादृष्टीनेही सिंदेवाही पोलीस तपास करीत आहेत.
चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश घारे, पोउनि. सागर महल्ले, पो.ह. विनोद बावणे, पो.शी. ज्ञानेश्वर ढोकळे, राहुल रहाटे, अरविंद मेश्राम, सत्यवान सुरपाम, मंगेश मातेरे, रणधीर मंदारे यांनी सदरहू कामगिरी केलेली आहे.