SINDEWAHI : पवनपार प्रा. आ. उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे आज लोकार्पण!

0

SINDEWAHI | 07 JULY 2024
तालुक्यातील पवनपार येथे जिल्हा खनिज निधीअंतर्गत बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रा च्या नविन इमारतीचे लोकार्पण आज सकाळी १०:३० वाजता संपन्न होणार आहे.


या उद्घाटनीय कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हे उद्घाटन करतील.
तर यावेळी विशेष अतिथी म्हणून क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसान, खासदार प्रतिभा सुरेश धानोरकर, विधानपरिषद सदस्य रामदास आंबटकर, विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी, विधान सुधाकर अडबाले, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, सरपंचा नीता वाढई हे प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या सुंदरशा कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी या उद्घाटनीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जि. प. चे कार्यकारी अभियंता (बांधकाम) विवेक पेंढे, सिंदेवाही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अक्षय सुक्रे यांनी केले आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !