SINDEWAHI : सिंदेवाही पोलिसांकडून दुचाकी चोरास अटक

0

दोन दुचाकी, एक लॅपटॉप जप्त!
SINDEWAHI | 28 MAY 2023
सिंदेवाही पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील अनेक दिवसांपासून घरफोडी व दुचाकी चोरी करणाऱ्याला सिंदेवाही पोलिसांनी अटक केली असुन आकाश खुशाल सिडाम (२९) असे आरोपीचे नाव आहे.
तो वडसा (जि. गडचिरोली) येथील रहिवासी असून त्याने साथीदार सचिन उर्फ बादशहा संतोष नगराळे (रा. राजुरा) याच्या साथीने चोरी केल्याचे कबुल केले आहे.
सिंदेवाही पोलिसांनी अटकेनंतर त्याच्याकडून MH 34- BX-9439 (किंमत ४०, ००० रुपये) आणि MH 34 BQ 9513 (किंमत ३५,००० रुपये) या दोन दुचाकी व एक लिनेवो कंपनीचा लॅपटॉप (किमंत २०००० रुपये) याप्रमाणे एकूण ९५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


सिंदेवाही पोलिस ठाणे हद्दीत वाढते घरफोडी व चोरीच्या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन छळा लावण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधीक्षक मुक्मका सुदर्शन यांनी पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार पोउनि सागर महल्ले यांनी पथक तयार करत गोपनीय बातमीदाराकडून माहीती मिळवत आधीच जेलची हवा खात असलेल्या राजुरा येथील सचिन उर्फ बादशाह नगराळे याचा साथीदार आकाश खुशाल सिडाम याला वडसा येथून ताब्यात घेत मुसक्या आवळला आहे.

या प्रकरणातील एक आरोपी जेलमध्ये असल्याने त्याला ताब्यात घेतल्यास आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता त्या दृष्टीने पुढील तपास सिंदेवाही पोलिस जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार तुषार चव्हाण यांच्या नेतृत्वात पोऊनि सागर महल्ले व पोहवा मधुकर आत्राम, गणेश मेश्राम करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !