Medical Camp : कोरपन्यातील महाआरोग्य शिबीराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

0

१२८८ रुग्णांनी केली विविध आजारांची तपासणी, तर ४५७ रुग्ण शस्त्रक्रियेस पात्र!
KORPANA | 26 MAY 2024
देवरावदादा भोंगळे मित्रपरिवार तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी(मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. २६) शहरातील श्रीकृष्ण सभागृहात भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 
नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात दिवसभर चाललेल्या या शिबीराचा कोरपना तालुका परीसरातील १२८८ नागरीकांनी लाभ घेतला.

 
सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या या शिबीरात मेडिसीन, नेत्ररोग, सर्जरी, बालरोग, स्त्रिरोग, कान-नाक-घसा, अस्तिरोग आणि त्वचारोग यांसारख्या रोगांवरील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. यामध्ये तपासणी झालेल्या १२८८ रुग्णांपैकी ४५७ रूग्ण हे शस्त्रक्रियेकरीता पात्र ठरले. त्यांचेवर उद्यापासून टप्प्या-टप्प्याने आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथे शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. 


या शिबिरामध्ये बोलताना, आयोजक तथा माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की, गोरगरीबांच्या हाकेला ओ देण्यासारखे दुसरे पुण्य नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात ग्रामीण भागातील गोरगरिब बांधव आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात; अनेकदा पैशाअभावी अतीगंभीर आजारही अंगावर काढतात त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात. अशावेळी तालुक्यातील गोरगरिब बांधवांना पायाच्या नखापासून तर डोक्याया केसापर्यंत भेडसावणाऱ्या समस्यांचे एकाच छताखाली निदान, उपचार व शस्त्रक्रिया मोफत करून देण्यासाठी मित्रपरिवारातर्फे अशाप्रकारच्या महाआरोग्य शिबीराचे आज आयोजन करण्याचे आले. या शिबिराचा परीसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. अनेक गरजू माताभगिनींना यामुळे आजारांचे निदान व उपचार मिळविता आले याचे मला आत्मिय समाधान वाटते. 


पुढे बोलताना, येत्या काही दिवसांत राजुरा विधानसभा क्षेत्रातील गोंडपिपरी, गडचांदूर, जिवती व राजुरा याठिकाणी सुद्धा अशाप्रकारच्या भव्य महाआरोग्य शिबीरांचे आयोजन होणार असून नागरिकांनी त्या ठिकाणीही अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ही त्यांनी केले. 


या शिबिराच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, गडचांदूरचे शहराध्यक्ष सतिश उपलेंचवार, तालुका उपाध्यक्ष पुरूषोत्तम भोंगळे, आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरूण मडावी, अमोल आसेकर, किशोर बावणे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजणे, ओम पवार, सुभाष हरबडे, विजय रणदिवे, नगरसेवक अरविंद डोहे, रामसेवक मोरे, शिवाजी सेलोकर, यशवंत पा. इंगळे, रामदास कुमरे, हरीश घोरे, संदीप शेरकी, सुधाकर ताजणे, अशोक झाडे, प्रमोद कोडापे, नैनेश आत्राम, दिनेश खडसे, निखिल भोंगळे, तिरुपती किन्नाके, मनोज तुमराम, धम्मकिर्ती कापसे, विशाल अहिरकर, सचिन आस्वले, रवी बंडीवार,जगदीश पिंपळकर, सागर धुर्वे, आशिष देवतळे, हर्षल चामाटे, सुरज तिखट यांचेसह अनेकांनी मेहनत घेतली.



Mecical Camp | Korpana | Chandrapur 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !