विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचेकडून महानिकाल.
MUMBAI । 10 JANUARY 2024
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात आज (बुधवार) मोठा निर्णय दिला आहे. राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही गटातील आमदारांना अपात्र केलं नाही. मात्र शिवसेना पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता देण्यात आली आहे.
राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले यांचा व्हिप वैध ठरवला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्ष गेला पण १४ आमदार राहीले आहेत.