ViksitBharatSankalpYatra : नगराध्यक्षांना विकसित भारत यात्रेची अलर्जी?

0


शासकीय कामात खोडा, स्वप्निल कावळेंवर दाखल गुन्हा !

SINDEWAHI। 28 JANUARY 2024
केंद्र सरकारच्या वतीने संपुर्ण देशभर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प रथयात्रेला (#ViksitBharatSankalpYatra) विरोध करत शासकीय कामात खोडा घातल्यावरून सिंदेवाही नगरपंचायतीचे नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रजासत्ताकदिनाच्या पुर्वसंध्येला (दि. २५) घडलेल्या या प्रकारामुळे शहरात काहिकाळ तणावपूर्ण परीस्थिती निर्माण झाली होती.


मोदी सरकारच्या वतीने केंद्र शासनाच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी संपूर्ण देशभर विकसित भारत संकल्प यात्रेची सुरवात करण्यात आली आहे. या धर्तीवर सिंदेवाही शहरात प्रजासत्ताकदिनाच्या पुर्वसंध्येला (दि. २५) या विकसित भारत संकल्प यात्रेचे आगमन झाले.

शहरातील बाजार चौकात हा कार्यक्रम शांततेत सुरु असतांना दुपारी ०५:०० वाजताच्या सुमारास नगरपंचायतीचे लेखाधिकारी सुरज गायकवाड हे शासकिय योजनांची माहीती देत असतांना नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांनी याठिकाणी येऊन अचानक लेखाधिकाऱ्यांच्या हातातील माईक हिसाकावुन घेतला; त्यांनतर संकल्प रथाच्या वाहनावर चढून शासकिय योजनांची माहीती असलेले पत्रकं काढत याठिकाणी माझे नाव का लिहले गेले? माझे नाव लावण्याचा तुम्हाला कुणी अधिकार दिला? तुम्हाला कार्यक्रम करायचा असल्यास तुम्ही दुसरीकडे जावुन कार्यक्रम करा, याठिकाणी कार्यक्रम करू नये. अशी धमकीवजा बाचाबाची त्यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी केली. यावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस शिपाई मदारे यांनी रोखण्याचा घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांना नगराध्यक्षांकडून धक्काबुक्की करण्यात आली. प्रसंगावधान राखून उपस्थितांनी परीस्थिती आटोक्यात आणली परंतू कार्यक्रम आटोपून सदर घटनेची माहिती पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर सदर घटनेची शहानिशा करून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सागर महल्ले यांनी नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांचेवर शासकीय कामात अडथडा आणल्या कारणाने भादंवि. कलम 353 व 506 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करून रात्री दहाच्या सुमारास अटक केली.

कावळेंच्या अटकेची माहीती मिळताच शहरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सिंदेवाही पोलिस ठाणे गाठत तणावसदृश्य वातावरण निर्माण केले. परंतू पोलीस प्रशासन सज्ज असल्याने शांतता राखली गेली.
त्यानंतर पोलिस विभागाने सर्व सोपस्कार पूर्ण करून सिंदेवाही कोर्टात हजर केले, त्यानंतर सिंदेवाही न्यायालयाने नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांची जमानतीवर सुटका करण्यात केली.

शहराच्या शांतता व सुव्यवस्थेसह विकासाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे अशा नगराध्यक्षांनीच शासकीय अधिकाऱ्यांशी असे गैरवर्तन केल्याने नागरीकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.

सदर प्रकरणाची पुढील चौकशी ठाणेदार तुषार चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलिस करत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !