पट्टेदार वाघाचा गुराख्यावर हल्ला! #Tigerattack

0

सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपारजवळील घटना..


Sindewahi । 23 Feb2023.
सिंदेवाही वनपरीक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र सिंदेवाही बिटातील (कच्चेपार) गट क्रमांक 147 मध्ये गुराखी बाबुराव लक्ष्मण देवताळे ( 56) याचेवर जंगलातून गुरेढोरे चारून घराकडे येत असतांना सायंकाळी ०५:३० च्या सुमारास पट्टेदार वाघाने हल्ला करून जखमी केले. परंतु वैद्यकीय उपचारासाठी चंद्रपूरला नेत असताना राजोलीजवळ शरीर प्रतिसाद देत नसल्यामुळे नजीकच्या मुल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. कच्चेपार येथील गुराखी बाबुराव देवताळे हा आपल्या दैनंदिनीनुसार जंगलातून गुरेढोरे चारून घराकडे आणत असतांना अचानक पट्टेदार वाघाने त्याच्यावर हल्ला (Attack) करून गंभीर जखमी केले.
त्याक्षणी संजय रामदास नैताम रा. कच्चेपार हे आपल्या शेतावरून तणशीचा गठ्ठा घेऊन घराकडे येत असतांना त्यांना मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने डोक्यावरील तणशीचा गठ्ठा तेथेच टाकून त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली.
तेव्हा पट्टेदार वाघाने (Tiger) गुराखी बाबुराव यांना पकडले होते. प्रसंगावधान राखून संजय यांनी आरडाओरड करत गावात फोन लावून घडलेली घटना सांगितली. लागलीच गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठलं. तेव्हा वाघाने पळ काढला.


सदर घटनेची माहिती मिळताच वनरक्षक कोहाडे तसेच गावातील धनराज सरपाते, साईनाथ सोनट्टके, प्रभाकर गव्हारे,रवींद्र कोवे, मुखरू जिवतोडे, सुमित चलाख, केजराज सरपाते व अमोल कोवे यांना कळताच त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाबुराव यांना प्राथमिक उपचारासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी वनविभागाच्या वतीने उपक्षेत्र अधिकारी हटवार यांनी ५०००/- रुपयांची तातडीची आर्थिक मदत परीवारातील सदस्यांकडे सुपुर्द केली. 
याप्रसंगी वनपरीक्षेत्र अधिकारी सालकर, उपक्षेत्र अधिकारी हटवार, उपक्षेत्र अधीकारी पेंदोर, वनरक्षक चौधरी उपस्थित होते.

बाबुराव देवताळे यांची प्रकृती चिंताजनक गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आले परंतु वैद्यकीय उपचारासाठी चंद्रपूरला नेत असताना राजोलीजवळ शरीर प्रतिसाद देत नसल्यामुळे नजीकच्या मुल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  


परंतू सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने तात्काळ या वाघाचा बंदोबस्त करावा आणि घरातील कमविता माणूस गेल्याने देवताळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. बाबुराव यांच्या पश्चात पत्नी माया, मुलगा प्रशांत व विवाहित मुलगी पपीता असा आप्त परिवार आहे. त्यामुळे बाबुराव यांच्या परीवाराला योग्य आर्थिक मोबदला मिळवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. 


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !