पट्टेदार वाघाचा गोठ्यात शिरून बैलावर हल्ला ! #Tigerattack

0


नरबळी घेणार्‍या वाघाचा कच्चेपारात दुसरा बळी! 


Sindewahi। 24 Feb 2023
सिंदेवाही तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या कच्चेपार येथे चोविस तासाच्या आत दोन दुर्दैवी घटना घडल्या आहेत. काल गावपरीसरात गुराखी बाबुराव देवताळे यांचेवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी (मृत पावले.) केलेल्या पट्टेदार वाघाने (tiger) स्थानिक रहिवाशी नरेंद्र नानाजी पिपरे यांच्या घराच्या गोठ्यात शिरून पांढऱ्या रंगाच्या बैलावर हल्ला चढवत जागीच ठार केल्याची घटना काल रात्री १२:३० - ०१:०० च्या दरम्यान घडली. 
कच्चेपार (Kachhepar) हे गाव चहुबाजूने जंगलव्याप्त असल्याने कालच गट क्रमांक 147 मध्ये गुरेढोरे चारून घरी परतताना गुराखी बाबुराव लक्ष्मण देवताळे (56) यांना ०५:३० च्या सुमारास पट्टेदार वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर पुढे उपचारासाठी चंद्रपूरला नेत असताना वाटेत राजोलीजवळ त्यांचा शरीर प्रतिसाद देत नसल्यामुळे नजीकच्या मुल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ही घटना ताजी असतानाच वाघाने गोठ्यात शिरूर बैलाला ठार केल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


त्यामुळे या घटनाक्रमांची गांभीर्याने दखल घेऊन वनविभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा. आणि नरेंद्र नानाजी पिपरे यांचा एक बैल जागीच ठार झाल्याने त्यांनाही योग्य आर्थिक मोबदला मिळवून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !