सर्वसामान्‍य जनतेच्‍या हाकेला ओ देणारे, सेवाभाव जपणारे कार्यकर्ते भाजपाची खरी शक्‍ती - ना. सुधीर मुनगंटीवार

0
श्री.अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा यांचे संपर्कातून पडोली, एमआयडीसी, लहूजीनगर, छोटा नागपूर, विचोडा (रै) येथील बहुजन समाज पक्ष व ठाकरे (शिवसेना) गट कार्यकर्त्‍यांचा भाजपात प्रवेश.

सर्वसामान्‍य जनतेच्‍या हाकेला ओ देत विकासकार्य व लोककल्‍याणकारी उपक्रमांच्‍या माध्‍यमातुन लोकसेवा करणारे कार्यकर्ते ही भारतीय जनता पार्टीची जमेची बाजू आहे. या कार्यकर्त्‍यांच्‍या माध्‍यमातुनच भारतीय जनता पार्टी जगातील सर्वात मोठी पार्टी ठरली आहे. निःस्‍वार्थ, निरपेक्ष समाजसेवा करणारे कार्यकर्ते आमची शक्‍ती आहे, असे प्रतिपादन सांस्‍कृतीक कार्य, वने व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक २४ नोव्‍हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या उपस्थितीत चंद्रपूर तालुक्‍यातील पडोली, एमआयडीसी, लहूजीनगर, छोटा नागपूर, विचोडा (रै) या ग्रामीण भागातील बहुजन समाज पक्ष व ठाकरे (शिवसेना) गट, ग्राम पंचायत सरपंच, सदस्‍य तसेच युवा पदाधिका-यांनी श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वावर विश्‍वास ठेवून त्‍यांच्‍या प्रमुख उपस्थितीती भारतीय जनता पार्टीमध्‍ये जाहीर प्रवेश घेतला. यावेळी भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते रामपाल सिंह, ब्रिजभूषण पाझारे, अनिल डोंगरे, हनुमान काकडे, दीपक सातपुते यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

नवप्रवेशित भाजपा कार्यकर्त्‍यांमध्‍ये एकनाथ देवतळे, ग्राम पंचायत सदक्ष बागेश्‍वर रामटेके, बंडू रामटेके, ग्राम पंचायत सदक्ष पोचमल्‍लु उलेंनला सरपंच मनीष देवतळे उपसरपंच अर्जुन ठाकुर, ऋषभ चनकापूरे, प्रणय संगोले, राहूल वराळकर, मनीष भोयर, कस्‍तुभ वर्मा, शुभम तुरानकर, नंदू बदखल इत्‍यादींनी प्रवेश घेतला. नवप्रवेशित भाजपा कार्यकर्त्‍यांच्‍या माध्‍यमातुन भाजपाचे संघटन अधिक बळकट होईल अशा विश्‍वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला. यावेळी नवप्रवेशित भाजपा कार्यकर्त्‍यांचे दुप्‍पटे प्रदान करून त्‍यांनी स्‍वागत केले व शुभेच्‍छा दिल्‍या. पक्षप्रवेश कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेकरिता विष्‍णु वरभे, रोहन चार्लेकर, मारोती पिंगे यांनी अथक परिश्रम घेतले.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !