क्रूर हत्यारा आफताबला फाशीच द्या! - जिल्हा उपाध्यक्ष वंदना शेंडे

0

महिला मोर्चाच्या वतीने उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांना निवेदन.

थोर संत-महात्मांची शिकवण आणि महापुरुषांच्या त्याग व समर्पणाचा जाज्वल्य विचार लाभलेल्या भारतभुमीत स्त्रियांचा मान सन्मान, प्रतिष्ठा प्राणपणाने जपली जाते, हा इतिहास आहे. परंतू दिवसेंदिवस स्त्रियांवर होणार्‍या अन्यान्य अत्याचारामध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळे सरकारने अशा गंभीर गुन्ह्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन, दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडातील विकृत आरोपी आफताब याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी ब्रह्मपुरी तालुका भारतीय जनता महिला मोर्चाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष वंदना शेंडे यांच्या नेतृत्वात आणि तालुकाध्यक्ष अरुण शेंडे, माजी पं. स. सभापती रामलाल दोनाडकर व भाजयुमो जिल्हा सचिव तनय देशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी यांचेमार्फत मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

वेळीच योग्य कार्यवाही न केल्यास भाजपा महिला मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

याप्रसंगी, जिल्हा उपाध्यक्ष रश्मी पेशने, भाजप जिल्हा सचिव तथा माजी जि. प. सदस्य दिपाली मेश्राम, महिला मोर्चाच्या जिल्हा सचिव मंजीरी राजणकर, सदस्य शिला गोंधोळे, न. प. नगरसेविका सौ. पुष्पा गराडे, माजी पं. स. सदस्य उर्मिला धोटे,सौ. सेठिये, विभाा सुभेदार यांचेसह महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !