Sindewahi : पत्रकार संजय पडोळेंना जिवे मारण्याची धमकी!

0


"त्या कॉंग्रेस नेत्याविरोधात" कारवाई करण्याची व्हाईस ऑफ मीडियाची मागणी..
SINDEWAHI | 26 JUNE 2024
मुल येथील दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी तथा व्हाईस ऑफ मीडियाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांना वृत्तपत्रात बातमी प्रकाशित केल्याच्या कारणावरून काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रकाश मारकवार यांनी भ्रमणध्वनी करून जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी संजय पडोळे यांनी पोलिसात तक्रार दिली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.


पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याने
या घटनेचा निषेध नोंदवत दोषीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी व्हाईस ऑफ मीडियाच्या सिंदेवाही तालुका पत्रकार संघटनेच्या शिष्टमंडळाने सिंदेवाही तहसीलदार आणि पोलीस स्टेशनच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.


निवेदन देतांना शिष्टमंडळात व्हाईस ऑफ मीडिया तालुकाध्यक्ष दयाराम फटिंग, अमर बुद्धपवार, सुनील घाटे, दिलीप मेश्राम, वहाबअली सैय्यद, शशिकांत बतकमवार, प्रशांत गेडाम आदी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !