BloodCamp : सिंदेवाही पोलीस ठाण्यात रक्तदान शिबीराचे आयोजन.

0

पोलीस अधीक्षकांची संकल्पनेला सिंदेवाहीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 
SINDEWAHI | 12 JUNE 2024
जिल्ह्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना दिल्या गेली; यावर पोलीस विभागाने खारीचा वाटा उचलल्यास मानवतावादी कार्य होईल. अशी परोपकारी भावना आपल्या विभागासमोर मांडून त्यांनी ठिकठिकाणी पोलीस ठाण्यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर घेण्यात यावे, असे निर्देश दिले. 
त्या पार्श्वभूमीवर काल (दि. ११) सिंदेवाही पोलीस ठाण्यात स्थानिक विविध सामाजिक संघटना, मंडळे आणि नगरपंचायत सिंदेवाही-लोनवाही च्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. 


सदर शिबीरास सिंदेवाही तालुक्यातील नागरीकांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत याठिकाणी 375 रक्तदात्यांनी स्वेच्छा रक्तदान केले. 
याचसोबत आतापर्यंत 50 वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना याठिकाणी विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांचे हस्ते गौरविण्यात ही आले. 


या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मागील दहा दिवसांपासुन काटेकोरपणे सुक्ष्म नियोजन करण्यात आले होते; त्या करीता तालुक्यातील पोलीस पाटील, विविध सामाजिक संघटना, युवक मंडळे, व्यापारी, धार्मिक संस्था/संघटना यांनी जोर बांधला होता. तसेच शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती, वन विभाग, सिंदेवाही शहर व्यापारी असोसिएशन, होमगार्ड पथक, पत्रकार मंडळींसह आदिंनीही विक्रमी रक्तदानासाठी मोलाचे सहकार्य केले. 


रक्तदान शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार तुषार चव्हाण, सपोनि अतुल स्थुल, पोउपनि अनील चांदोरे, पोउपनि सागर महल्ले व सहकारी पोलीस अंमलदार रणधीर मदारे, सत्यवान सुरपाम, मंगेश मातेरे, शरद सावसाकडे, संजीव गेडेकर, सुरज जांभुळे, डॉ. अमीत प्रेमचंद, डॉ. मिलींद झाडे, पंकज पवार ( समाज सेवक अधीक्षक ), रक्तपेढी चंद्रपूर रक्तपेढीचे डॉ. रोहन झाडे, ग्रामीण रुग्णालय सिन्देवाही आदींनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !