Chandrapur Loksabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपूरात!

0

◾सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराने विदर्भातून प्रचाराचं रणशिंग फुंकणार!
CHANDRAPUR | 08 April 2024
आजपासून पूर्व विदर्भात पहिल्या टप्यातील लोकसभा (Maharashtra Politics) मतदारसंघात सभांचा धडाका सुरू होणार आहे. त्याकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज चंद्रपूरात येणार असून येथील मोरवा विमानतळ परीसरात त्यांची जाहीर सभा होणार आहे.


महायुतीचे अधिकृत लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचाराचा नारळ फोडून तेथे ते विदर्भातील पहिली सभा घेणार आहेत. राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चांगलीच रणधुमाळी पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. यूपीचे योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे देखील आज विदर्भात सभा घेणार आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाटमध्ये भाजपचे उमेदवार तथा खासदार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ ते सभा घेत असल्याची माहिती मिळत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
आज सायंकाळी ०३ वाजता मोरवा विमानतळ परीसरातील सोळा एकर परीसरात साकारलेल्या मैदानावर मोदींची सभा पार पडणार असून महाराष्ट्रातील जनतेला विशेषतः विदर्भातील मतदारांना उद्देशून ते आज काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

#NarendraModi #BJP #Chandrapur #PublicAddress #LokSabhaElection2024

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !