तेली समाजाला उमेदवारी देऊन वंचित साधणार का निर्णायक भुमिका?
CHANDRAOUR | 27 MARCH 2024
वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज लोकसभेच्या ०८ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे.
तर सर्वांचे लक्ष लागून असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता वंचित बहूजन आघाडीने (VBA) राजेश बेले यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
वणी-आर्णी-चंद्रपूर लोकसभा मतदार संघात भाजप आणि काँग्रेस ने उमेदवारी अर्ज दाखल केला असून राजेश बेले हे आज सायंकाळपर्यंत आपला नामांकन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.