Chandrapur : सरदार पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आकाशवाणी केंद्रास शैक्षणिक भेट.

0

CHANDRAPUR | 27 March 2024
सरदार पटेल महाविद्यालयातील एम. ए. मॉस कम्युनिकेशन (MA Mass Communication) विभागाच्या वतीने आज स्थानिक आकाशवाणी केंद्राला शैक्षणिक भेट देण्यात आली.
या दरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांनी 103.0 MHz चंद्रपूर आकाशवाणी (AIR Chandrapur) केंद्रावरून प्रसारीत होणारे कार्यक्रम आणि केंद्राच्या दैनंदिन कामकाजाविषयी तेथील अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.
यावेळी विद्यार्थ्यांबरोबर विभाग प्रमुख डॉ. पंकज मोहरीर, प्रा. संजय रामगीरवार आणि प्रा. अरविंद खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते.


चंद्रपूर आकाशवाणी केंद्राचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालावे यासाठी कार्यरत असलेल्या विविध विभागांची केंद्राचे वरीष्ठ अभियंता चंद्रकांत मत्ते यांनी विद्यार्थ्यांना तोंड ओळख करून देत विषयवार सविस्तर माहिती दिली. यासोबतच आउटडोर आणि इनडोर रेकाॅर्डिंग, मल्टिपर्पज स्टुडीओ, नियंत्रण कक्ष
बाह्य प्रसारण उपस्करण कक्ष, प्रसारण स्टुडिओ तसेच V नॅम सॉफ्टवेअरचे कामकाज आदिंची रचनात्मक माहितीही केंद्रातील वरीष्ठ अभियंता राजेंद्र माडे, निवेदक सतिश धुर्वे, हेमा बहादे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
यावेळी आकाशवाणीच्या संचालिका तथा कार्यक्रम अधिकारी नंदा गजभिये आणि सहाय्यक संचालक संध्या किलनाके यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करीत त्यांना उद्भवलेल्या प्रश्नांचे निराकरण केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !