SportandCulture गुंजेवाहीत शालेय क्रिडा स्पर्धा तथा सांस्कृतिक कार्यक्रम.

0

जि. प. हायस्कूल तर्फे २७ ते ३० डिसेंबर दरम्यान होणार आयोजन.. 
SINDEWAHI । 23 DECEMBER 2023
तालुक्यातील गुंजेवाही येथील जिल्हा परिषद हायस्कूल च्या वतीने विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने दि. २७ ते ३० डिसेंबर दरम्यान शालेय क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


यामध्ये दि. २७ रोजी सकाळी ०८:३० वाजता सरपंच वसंत टेकाम यांच्या शुभहस्ते क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन होऊन विविध कार्यक्रमांना सुरवात होणार आहे. तर २८ रोजी दिवसभर वैयक्तीक व सांघिक क्रिडा स्पर्धा पार पडणार असून दि. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ०७:०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार असून माजी पं. स. सदस्य राहूल पोरेड्डीवार यांचे शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन नियोजित आहे. त्यानंतर दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) अनिता ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसांचे वितरण केले जाणार आहे. 


तरी या क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमांना विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !