#Tigerattack शेतकामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्याला वाघाने केले ठार!

1

पत्नीदेखत पती गेला, तीन तासानंतर मृतदेहाचा शोध..

CHIMUR। 11 JULY 2023
तालुक्यातील सावरगाव येथील शेतशिवारात स्वतःच्या शेतामध्ये तुरीची लागवड करत असतांना अचानक वाघाने हल्ला करून एका 45 वर्षीय शेतकऱ्याला उचलून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
वाघाने तोंडात पकडून जंगलाच्या दिशेने फरफटत नेल्यामुळे या शेतकर्‍याचा मृत्यू झाला. सदर घटना आज मंगळवारी (दि. ११) दुपारच्या सुमारास घडली असून ईश्वर गोविंदा कुंभारे असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.


सदर घटनेवेळी मृतकाची पत्नी जवळच असल्याने तीने आरडाओरडा करत वाघाच्या तावडीतून पतीला सोडविण्यासाठी धावाधाव केली परंतू वाघाने पतीला तोंडात पकडून जंगलाच्या दिशेने वेगात फरफटत नेल्याने घनदाट जंगलापाई पतीला वाचविण्यात तीला अपयश आले. घाबरलेल्या अवस्थेत घडलेली सर्व आपबीती पत्नीने आजूबाजूच्या शेतकर्‍यांना सांगितली. काही शेतकरी मदतीला धावूनही आले परंतू वाघ जंगलात शिरल्याने पत्ता लागला नाही. दरम्यान नेरी बिटाचे क्षेत्र सहाय्यक रासेकर यांना सदर घटनेची माहिती देण्यात आली. त्यानुसार वपरीक्षेत्राधिकारी देऊळकर यांचेसह वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये तब्बल तीन तासानंतर मृत शेतकरी ईश्वर कुंभारे यांच्या मृतदेहाचा शोध लागला.

#Tigerattack #Chandrapur #Maharashtra

Post a Comment

1Comments
Post a Comment

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !