BreakingNews : राष्ट्रवादीत भूकंप!

0

अजीत दादा पून्हा शपथ घेणार?
MUMBAI । 02 JULY 2023
राज्याच्या राजकारणात आज मोठा भूकंप होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्राचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या पदाचा राजीनामा देऊन सरकारमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.


अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यासाठी अजित पवार हे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसह राजभवनात दाखल झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील राजभवनाकडे रवाना झाले आहे.

आज होणार्‍या शपथविधीत अजीत पवार उपमुख्यमंत्री तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील हे मंत्रीपदाची शपथ घेतील अशी सूत्रांची माहिती आहे. 


असे झाल्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री म्हणून सरकारात दिसतील.




Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !