Sindewahi : विषयतज्ज्ञाकडूनच विद्यार्थीनींचा विनयभंग!

0सिंदेवाही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

SINDEWAHI । 14 JULY 2023
पंचायत समितीच्या शिक्षण विभागात विषयतज्ज्ञ म्हणून कार्यरत असणार्‍या शिक्षकानेच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
सदर घटनेवरून पिडीत मुलीच्या कुटुंबीयांनी बुधवारी (दि. १२) रोजी सिंदेवाही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
भारत मेश्राम (४२) असे ताब्यात घेण्यात आलेल्या विषयतज्ज्ञाने नाव असून सद्या आरोपीची रवानगी चंद्रपूर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.


सिंदेवाही पंचायत समितीतील शिक्षण विभागात विषयतज्ज्ञ म्हणून सेवा देणारा भारत मेश्राम हा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षा, निबंध स्पर्धा आयोजित करतो. अशाच कार्यक्रमांच्या माध्यमातून त्याची पिडीतेशी ओळख झाली. त्या ओळखीतून पुढे तिच्या कुटुंबीयांशी संपर्क वाढविला. आईवडीलांना विश्वासात घेऊन सिंदेवाहीत तिच्या पुढच्या शिक्षणासाठी खोली करून दिली. बुधवारी या मुलीचा वाढदिवस असल्याने तिच्या खोलीवर जाऊन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पिडीतेने विरोध केल्याने त्याने घटनास्थळावरून पोबारा केला.
पिडीतेने तिचा लहान भाऊ खोलीवर आल्यानंतर संपूर्ण आपबीती भावाला सांगितली आणि त्यानंतर पिडीतेच्या आईवडीलांनी सिंदेवाही गाठून पोलिसांत तक्रार दिली. त्यावरुन सिंदेवाही पोलिसांनी भादंवि कलम ३५४, ३५४ (अ), ४५१ तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ (८) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !