Sindewahi : तहसीलदार नीलिमा रंगारी निलंबित!

0


पोलिस पाटील, कोतवाल पदभरती भोवली.. 
SINDEWAHI । 29 JUNE 2023
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात पोलीस पाटील व कोतवाल पदभरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्यावरील आरोप सिद्ध झाल्याने पवणीच्या माजी तहसीलदार तथा सिंदेवाहीच्या विद्यमान तहसीलदार निलिमा रंगारी (Tahsildar Nilima Rangari) यांना निलंबित करण्यात आले आहे.
विभागीय आयुक्त नागपूर यांनी दि. २० जून २०२३ रोजी काढलेल्या आदेशानुसार सदर कारवाई करण्यात येत असल्याचे शासनाचे अवर सचिव संजय राणे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.


तहसीलदार निलिमा रंगारी यांच्या निलंबनाचे आदेश मंगळवारी धडकताच सिंदेवाही तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली.
ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन च्या वतीने भंडारा उपविभागात झालेल्या कोतवाल व पोलीस पाटील पदभरती घोटाळा झाल्याची तक्रार दाखल करुन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.
तहसीलदार रंगारी यांच्या निलंबनामुळे इतर अधिकाऱ्यांचेही चांगलेच धाबे दणाणले असून अनेकांची झोपमोड झाली आहे.
निलंबनाच्या सदर आदेशानुसार श्रीमती रंगारी यांना शासनाच्या पुढील आदेशापावतो जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे मुख्यालयीन रहावे लागणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाहिये.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !