Mumbai : बावनकुळे बदलणार शंभर टक्के जिल्हाध्यक्ष!

0


सर्व ठिकाणी नविन चेहरे, कही खुशी कही गम.. 


MUMBAI । 05 JUNE 2023
राज्यातील भारतीय जनता पक्षाचे (BJP Maharastra) सर्व जिल्ह्यांचे तसेच महानगरांचे अध्यक्ष लवकलच बदलण्यात येणार आहेत. लोकसभा-विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना नव्या दमाच्या लोकांना संधी देण्याचा विचार पक्षनेतृत्वाने केला आहे. 


प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar Bawankule) हे भाजपचे ७० टक्के जिल्हाध्यक्ष बदलणार असल्याचे मागील अनेक महिन्यांपासून सांगत आहेत. त्यामुळे आता आपल्या नावाला पुन्हा संधी की कात्री हा विचार करून बरेच जिल्हाध्यक्ष उदासीन झाले आहेत. जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले जिल्ह्याजिल्ह्यातील नेते मुंबईत चकरा मारत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या गाठीभेटी घेत आहेत. 

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आधी ७० टक्के जिल्हाध्यक्ष बदलाचे संकेत दिले होते. परंतू खात्रीलायक सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे आता १०० टक्के नवीन चेहरे देण्याचा निर्णय झाला आहे.

पक्षासाठीचे योगदान, कार्यकर्त्यांच्या भावना, पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून मिळालेला फीडबॅक आणि संघ परिवारातील प्रमुख व्यक्तींनी दिलेला सल्ला या आधारावर ह्या नव्या नियुक्त्या होतील असेही सूत्रांनी सांगितले. MODI@9 हे अभियान ३० जूनपर्यंत चालणार आहे, त्याच्या मध्येच बदल करायचे की नंतर यावर अद्याप निर्णय झालेला नाही.


लोकसभा-विधानसभेसाठी समन्वयक नेमणार :

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघ आणि २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी भाजपकडून समन्वयक नेमण्यात येणार आहेत. 
आमदार, खासदारांना त्यात जास्तीतजास्त संधी दिली जाईल. निवडणुकीपुरती पक्षाची जबाबदारी या समन्वयकांवर असेल.

आजी-माजी आमदारांना संधी नाही! 

भाजपने राज्यात लोकसभेच्या किमान ४२ जागा जिंकण्याचे मिशन हाती घेतले आहे. ते यशस्वी करायचे तर आमदारांना जिल्हाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मोकळे ठेवावे लागेल व लोकसभा निवडणुकीसाठी तयार केल्या जाणाऱ्या समित्यांमध्ये घ्यायचे असा विचार होत आहे. त्यामुळे डझनभर जिल्हाध्यक्ष kinvae महानगर अध्यक्ष असलेल्या विद्यमान आमदारांना आता पद सोडावे लागणार आहे. आता नवीन जिल्हाध्यक्ष नेमताना आमदारांना संधी द्यायची नाही असा निर्णय झाल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

मुंबईत आशिष शेलार कायम 

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आमदार आशिष शेलार (ashish shelar) कायम राहतील. महानगरपालिका लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्याकडेच अध्यक्ष पद कायम राहणार असल्याचेही सुत्रांकडून कळविण्यात आले आहे. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !