Maharashtra : मंत्रिमंडळ विस्तार फायनल!

0

भाजप-सेनेच्या या नेत्यांना संधी..? 
MUMBAI । 06 JUNE 2023
मागील अनेक दिवसांपासून राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या शक्यता आणि तारखा वारंवार समोर येत आहेत. त्यातच रविवारी (०४ जून) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा (Amit shah) यांची दिल्लीत भेट घेतली आहे.
या भेटीत राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे. तर शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या आधी म्हणजे १९ जून च्या आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.




संभाव्य मंत्रीपद मिळणारे आमदार -

भाजप BJP आणि शिवसेनेतील प्रत्येकी १० आमदारांना (MLA) मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आमदारांची नावं देखील समोर आली आहे. भाजपकडून संजय कुटे विदर्भ, योगेश सागर मुंबई, किसन कथोरे, मनीषा चौधरी, रणधीर सावरकर, गणेश नाईक, माधुरी मिसाळ प. महाराष्ट्र , मराठवाडा मेघना बोर्डीकर मराठवाडा, जयकुमार रावल उ. महाराष्ट्र, देवयानी फरांदे यांची नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.

तर शिवसेना Shivsena (शिंदे गट) योगेश कदम, भरत गोगावले कोकण, बच्चू कडू विदर्भ, संजय रायमूलकर, संजय गायकवाड मराठवाडा संजय शिरसाट, प. महाराष्ट्र अनिल बाबर, प्रकाश आबिटकर, यामिनी जाधव मुंबई, चिमणराव पाटील, सुहास कांदे उ. महाराष्ट्र यांना मंत्रिपद मिळू शकते अशी माहिती समोर येत आहे.

सध्याच्या घडीला शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपचे २० मंत्री आहेत. यामध्ये सर्व कॅबिनेट मंत्री आहेत. विधानसभेच्या एकूण सदस्यांची संख्या लक्षात घेता २३ जणांना मंत्रिपद दिले जावू शकते, अशी माहिती माध्यमांतील सूत्रांनी दिली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !