नागपूर ते हैदराबाद धावणार vande bharat express...

0


ना. सुधीर मुनगंटीवारांच्या प्रयत्नांना रेल्वेकडून हिरवा कंदील!

CHANDRAPUR। 23 MAY 2023 
येत्या वर्षात देशात लोकसभा निवडणुकीचे आणि राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. म्हणून आता सरकारकडून विविध विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर संपूर्ण भारतीय बनावटीची आणि मेक इन इंडिया (Make in India) प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली वंदे भारत ट्रेन (vande bharat express) सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२३ पर्यंत संपूर्ण देशात ७५ वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. अशातच महाराष्ट्राला देखील काही वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळणार आहे. यात नागपूर ते हैदराबाद (nagpur to hyderabad) दरम्यान देखील ही हायस्पीड ट्रेन सुरू केली जाणार आहे.


राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर तसेच विदर्भातील नागरिकांच्या सोयीसाठी नागपूर ते हैदराबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (railway minister ashwini vaishnaw) यांच्याकडे केली होती. आता सुधीर मुनगंटीवार यांच्या या मागणीला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दाखवला असून या मार्गावर ही हायस्पीड ट्रेन सुरू करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी सुरू झाली आहे.
सध्या नागपूर ते हैदराबाद दरम्यान २५ एक्सप्रेस ट्रेन सुरू आहेत मात्र यामध्ये शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस सारख्या जलद (superfast) गाड्या खूपच कमी आहेत. 
यामुळे या मार्गावर नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया समवेतच संपूर्ण विदर्भातील प्रवाशांकडून वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी आहे. आता या मागणीवर गांभीर्याने लक्ष घातले गेले असून लवकरच या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !