BJPChandrapur : MODI @9 महा-जनसंपर्क अभियान व अन्य संघटनात्मक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर भाजपाची जिल्हा बैठक संपन्न.

0CHANDRAPUR । 23 MAY 2023
MODI @9 महा-जनसंपर्क अभियान व बूथ सशक्तिकरण अभियान तसेच अन्य महत्वपूर्ण संघटनात्मक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. २१ मे) रोजी चंद्रपुरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात जिल्हा भाजपची संघटनात्मक बैठक संपन्न झाली.


या बैठकीत, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी MODI @9 महा-जनसंपर्क अभियानाचे यशस्वी आयोजन आणि विविध संघटनात्मक कार्यक्रमांच्या संदर्भाने उपस्थितांशी समारोपीय संवाद साधला.


त्याआधी, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष श्री. हंसराज अहीर (hansraj Ahir) यांनी उपस्थितांना महा-जनसंपर्क अभियान तसेच बूथ सशक्तिकरण अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी आवाहनपर मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील बुथ सशक्तिकरण अभियानाचा आढावा, सरल ॲप डाउनलोड व नोंदणी, फ्रेंड ऑफ बीजेपी, धन्यवाद मोदीजी पत्रे यासोबतच जिल्हाभर मंडळ निहाय करावयाच्या बैठका आणि MODI @9 महा-जनसंपर्क अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्तम तयारी व इतर संगटनात्मक कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भाने जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी उपस्थितांना विस्तृतपणे चर्चात्मक माहीती दिली.


प्रसंगीच, माजी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी दि. १८ मे २०२३ रोजी पुणे येथे झालेल्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत मांडण्यात आलेला “शिंदे-फडणवीस सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताप” मांडला, या प्रस्तावावर जेष्ठ नेते राजेंद्र गांधी यांनी अनुमोदन दिले.


यासोबतच जिल्ह्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत विजयी झालेल्या सभापती व उपसभापतींचे ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते यावेळी स्वागतही करण्यात आले.

या बैठकीला जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, जेष्ठ नेते प्रमोद कडू, प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा वनिता कानडे, प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाचे जुनेद खान, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कु. अल्का आत्राम, जिल्हा आयटी सेल संयोजक निखिल देशमुख, प्रदेश कार्यसमितीचे निमंत्रित सदस्य अमित गुंडावार, विवेक बोढे, रघुवीर अहीर, जिल्हा पदाधिकारी, सर्व मंडळ अध्यक्ष व महामंत्री, जिल्हा आघाड्या/मोर्चाचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विशेष जनसंपर्क अभियानाचे प्रमुख आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !