SINDEWAHI । 20 MAY 2023
अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक तसेच अंबिका माता देवस्थान कमेटी गुंजेवाहीचे माजी अध्यक्ष सुधाकरराव चन्ने यांचे आज (दि. २०) पहाटे ०४ च्या दरम्यान दुःखद निधन झाले.
वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ०४ वाजता गुंजेवाही येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले-मुली, स्नुषा, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.
गावचे यशस्वी पोलीस पाटील म्हनून दिर्घकाळ पद सांभाळणारे “सुधाकर सावकार” कमालीचे उत्साही आणि कार्यतत्पर होते. वयाची ऐंशी पार केल्यानंतरही आपल्या दैनंदिन कामात ते व्यस्त असायचे. नियमित पहाटे गुरुदेव सेवा मंडळाची ध्यानप्रार्थना आणि अंबिका मंदिरावरील आई अंबाबाईचे दर्शन हा त्यांचा नित्यक्रम होता. ते अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक म्हणूनही परीसरात गुरूदेव सेवा मंडळाच्या कार्यवाढिसाठी पुढे होते. उतार वयामुळे अलिकडेच त्यांनी अंबिका देवस्थान कमेटीचे सुत्रही इतरांकडे सोपविले.
गावाच्या विकासासाठी आड येणारा कोणताही प्रश्न सोडविण्याची हातोटी, ग्रामोन्नतीचा विचार आणि आध्यात्मिक धडपड असलेले सुहृदयी सुधाकर सावकार गुंजेवाही वासीयांच्या कायम स्मरणात राहतील..
त्यांच्या जाण्याने गुंजेवाहीने सर्वसमावेशक असा जेष्ठ मार्गदर्शक गमावला आहे.
चांदा न्यूजच्या समस्त वाचकांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! 🌼