राजकीय वर्तुळात खळबळ!
CHANDRAPUR। 11 MAY 2023
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (CDCC) अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, कॉंग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचेवर आज सायंकाळच्या सुमारास अज्ञाताने गोळीबार केला.
सुदैवाने या गोळीबारात रावत यांना कोणतीही इजा झाली नसली तरी गोळी त्यांच्या हाताला घासून गेल्याचे समजते. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
आज संध्याकाळच्या वेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मूल (Mul) शाखा परिसरात हा गोळीबार करण्यात आला. तसेच गोळीबार करणारा अज्ञात असून तो फरार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असलेल्या संतोषसिंह रावत यांच्यावर कोणत्या हेतूने गोळीबार करण्यात आला? कोणी करविला/केला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मात्र अनुत्तरीत आहेत. मुल शहरात प्रथमच असा प्रकार घडल्याने या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासोबतच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अनेकांकडून तर्कवितर्क काढले जात आहेत.