Aaditya Thackeray : तर.. मी राजीनामा देईन!

0



मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आदित्य ठाकरेंचा प्रति-आव्हान!

MUMBAI। 21 MAY 2023
राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि ठाकरे गटाचे आमदार माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली आहे.
“राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात (Shinde-Fadanvis) जनमत आहे असं वाटतंय तर वरळी विधानसभेचा राजीनामा द्या! तिथे नव्याने निवडणूक घेऊ. ठरवू काय होतं ते”, असं आव्हान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार आदित्य ठाकरे यांना दिलं. आदित्य ठाकरे यांनीही हे आव्हान स्वीकारलं असून “घटनाबाह्य मुख्यमंत्री वरळीतून लढणार असतील तर, होय मी राजीनामा देतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझ्यासमोर उभं करा”, असा प्रति आव्हानचं आदित्य ठाकरे यांनी मुगंटीवारांना दिलं आहे. तसेच, ‘सरकारमध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कोणी ऐकत नाही’, अशी कोपरखळी ही त्यांनी लगावली.


मुंबई फुटबॉल असोसिएशन, फुटबॉल ऑस्ट्रेलिया आणि मुंबईतील ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासद्वारे आजपासून पुढील दोन दिवस फुटबॉल डेव्हलपमेंट वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलं आहे. या फुटबॉल वर्कशॉपच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !