Sindewahi : पत्रकारांच्या न्याय मागण्यांसाठी सिंदेवाहीत एक दिवसीय धरणे आंदोलन!

0


तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन..

SINDEWAHI ।11 MAY 2023
पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी राष्ट्रीय संघटना व्हॉईस ऑफ मीडिया आणि संगटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या सुचनेनुसार, प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के तसेच विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यात तसेच सिंदेवाही मध्येही वृत्तपत्र आणि पत्रकारांच्या न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी स्थानिक तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.




आंदोलनाच्या शेवटी तहसिलदार एन. एस. रंगारी यांनी आंदोलनस्थळास भेट दिल्यानंतर त्यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.




माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पहिले जाते. मात्र माध्यमकर्मींच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासनाकडून काही ठोस उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावे, पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोना महामारीत जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे त्यामुळे लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात आणि साप्ताहिकांनाही त्याच प्रमाणात जाहिराती द्याव्यात. अशा विविध रास्त मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज सिंदेवाहीत हे धरणे आंदोलन पार पडले.


यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा प्रवक्ते अमर बुध्दारपवार, सिंदेवाही तालुकाध्यक्ष दयाराम फटींग , तालुका सरचिटणीस दिलीप मेश्राम, कार्याध्यक्ष - सुनील घाटे, उपाध्यक्ष खलिद पठाण, उपाध्यक्ष शशिकांत बदकमवार, कोषाध्यक्ष, प्रशांत गेडाम , कार्यवाहक अरुण मादेशवार, संघटक वहाबअली सय्यद, कुसन गौरकर , डिजीटल मिडीया अध्यक्ष मिथुन मेश्राम आदीसह प्रिंट मिडीया व डिजीटल मिडीयाचे पत्रकार बांधव तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !