ED : खासदाराचा मेहुणा ईडीच्या रडारवर!

0

चंद्रपुर जिल्ह्यात ED धडकणार ? 


CHANDRAPUR । 26 MAY 2023
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेचे खासदार बाळू (सुरेश) धानोरकर (Balubhau Dhanorkar) यांचे मेहुणे आणि भद्रावती-वरोरा विधानसभेच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ प्रविण काकडे यांचेविरोधात भद्रावती आणि नजिकच्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या आर्थीक गैरव्यवहाराच्या तक्रारी तसेच ईडीला ( Enforcement Directorate) प्राप्त तक्रारीच्या पाश्र्वभूमीवर आता ईडीने चांगलीच कंबर कसली आहे. त्यामुळे येत्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात ईडी धडकणार का? असा सवाल नागरिकांना पडला आहे. 


प्रवीण सुरेश काकडे यांचे विरोधात PMLA (The  Prevention Of Money -Laundering Act) अंतर्गत फसवणूक केल्याच्या आरोपावरून जिल्ह्यातील भद्रावतीसह लगतच्या पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारींची सविस्तर माहिती ईडीला कळविण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाचे उपसंचालक संजय बंगारतळे (IRS) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रविन्द्रसिंह परदेशी यांना पत्रव्यवहार केला आहे. सोबतच यासंदर्भातील संपूर्ण कागदपत्रे आणि ईडीला सहकार्य करण्याची सूचनाही त्यांनी पाठविलेल्या पत्रात केली आहे. 


त्यामुळे, सद्या राज्यातील अनेक नेत्यांना नाचविणाऱ्या ईडीची चंद्रपूरात एंट्री झाल्यास जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळेच वळण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोबतच एरव्ही पंतप्रधान मोदींच्या निर्वाचन क्षेत्रात जाऊन निवडणूक लढवण्याची भाषा करणारे खासदार बाळू धानोरकर याप्रकरणात काय भुमिका घेतील? हे ही पाहणे औचित्याचे असणार आहे. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !