Delhi : खासदार बाळू धानोरकर एअर एम्बुलेंसने दिल्लीत!

0


प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे कार्यालयाकडून आवाहन.. 

CHADRAPUR । 29 MAY 2023
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेचे खासदार बाळू धानोरकर (Balubhau Dhanorkar) यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना नागपूर येथून दिल्ली येथील मेदांता हॉस्पिटल (medanta hospital) येथे एयर एम्बुलेंसने पाठविण्यात आले. 
खासदार धानोरकर हे सद्या मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. 


शनिवारी (दि. २७) रोजी नागपूर (Nagpur) येथील खासगी रुग्णालयात किडनी स्टोनवर उपचार सुरू असतानाच अचानक खासदार बाळू धानोरकर यांच्या पोटात दुखू लागल्याने उत्तरीय उपचार व तपासणीसाठी त्यांना दिल्ली येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये एअर एम्बुलेंसने नेण्यात आले. 
शनिवारीच त्यांच्या वडीलांचे स्व. नारायण धानोरकर यांचे निधन झाले. त्यांच्यावर भद्रावतीत अंत्यसंस्कार करण्यात आले परंतू आजारी धानोरकरांना वडीलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहता आले नाही. 

सद्या त्यांची प्रकृती स्थिर असून समाज माध्यमांवर कोणीही कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये. शिवाय कोणत्याही अनधिकृत मॅसेजवर नागरिकांनी विश्वास ठेवून, भयभीत होऊ नये. तसेच खासदारांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन निरोगी आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन त्यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !