महाराष्ट्रील कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

0


दिल्लीतील मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास!


CHANDRAPUR । 30 MAY 2023
महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार म्हणून नेहमी चर्चेत असणारे चंद्रपूर-वणी-आर्णी (Chandrapur) लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर (Balubhau Dhanorkar) यांचा मंगळवारी पहाटे ०२:३० च्या दरम्यान दिल्ली येथील मेदांता रूग्णालयात (Medanta hospital) अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. 
वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी त्यांनी मृत्यूसमोर गुडघे टेकल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. 
त्यांच्या पश्चात आई, पत्नी आमदार प्रतीभा धानोरकर, दोन मुले असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. 


बाळू धानोरकर यांना आतड्यात इन्फेक्शन झाल्याने नागपूरातील गेट वेल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथील उपचारांनंतर धानोरकरांना पुढील उपचारासाठी दिल्लीला एअर ऍम्बुलन्सच्या माध्यमातून हलवल्याने त्यांच्या प्रकृतीबाबतच्या उलट सुलट चर्चांना उधाण आले होते.

बाळू धानोरकर यांचे पार्थिव आज एअर एम्बुलेंसने दिल्लीवरून नागपूर आणि त्यानंतर वरोरा येथे आणण्यात येणार असून दुपारी ०२ वाजतापासून सायंकाळी ०४ वाजेपर्यंत त्यांच्या वरोरा येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर, ३१ मे रोजी वरोरा-वणी बायपास वरील मोक्षधाम येथे सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांच्यावर नागपूर व दिल्ली येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. कॉंग्रेसच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांसाठी हा धक्का असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजकिय प्रवास :
बाळू धानोरकर यांच्या राजकीय जिवनाची सुरवात शिवसेनेतून झाली. २००६ साली ते चंद्रपूर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. त्यानंतर २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून येत धानोरकरांनी माजी पालकमंत्री स्व. संजय देवतळे यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे विद्यमान अध्यक्ष हंसराज अहिर (Hansraj Ahir) यांचा ही पराभव करत महाराष्ट्रातून कॉंग्रेसला एकमात्र जागेवर यश मिळवून दिलं होतं. सद्या त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या सुद्धा वरोरा विधानसभेच्या आमदार आहेत. 

टीम www.chandanews.com कडून खासदार बाळू धानोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !