Chandrapur : खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक!

0
“चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी”

पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली शोकसंवेदना..

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळु धानोरकर (Balubhau Dhanorkar) यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व धक्कादायक आहे, त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अशी शोकसंवेदना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केली आहे.


खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. लोकहितासाठी आक्रमक भूमिका घेणारे अशी खासदार धानोरकर यांची ओळख होती. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात (Medanta hospital Delhi) उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तीनच दिवसांपूर्वी म्हणजे २७ मे रोजी खासदार धानोरकर यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्यानंतर आज धानोरकर यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारावर जो दु:खाचा डोंगर कोसळला आहे, त्यातून त्यांना सावरण्याची प्रार्थना माता महाकाली चरणी करतो’, अशा शब्दात ना. श्री. मुनगंटीवार यांनी धानोरकर यांच्या प्रति श्रद्धांजली व्यक्त केली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !