Warora : कत्तलखान्यात जाणाऱ्या १७ जनावरांची सुटका!

0


वरोरा पोलीसांची कारवाई, आरोपींची धरपकड.. 


Warora। 04 April 2023
निष्पाप जनावरांची कमी दरात खरेदी करून कसायाला विकण्याचा गोरखधंदा अनेकजागी सुरू आहे. वरोरा शहरानजीकच्या माढेळी नाक्यावरून दोन बोलेरो (Bolero) पिकअप वाहनांतून १७ जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याची गुप्त माहिती वरोरा पोलीसांना मिळाली. 


सदर माहितीची दखल घेऊन पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा पोलीसांनी या मार्गावर पाळत ठेवून दोन वाहने पकडली. 
या कारवाईनुसार, MH 29 T-654 क्रमांकाच्या बोलेरो वाहनातून १७ जनावरे ताब्यात घेण्यात आली. परंतू दुसऱ्या बोलेरो वाहनावर नंबरप्लेट नसल्याने त्या वाहनाची अधिक माहिती मिळू शकली नाही. या आरोपींपैकी एकाचा मुसक्या आवळण्यात आला असून नितेश शंकर सातपैसे (२५) रा. वाशी कोरा, ता. समुद्रपूर, जिल्हा वर्धा येथील तो रहिवासी आहे.
ही कारवाई २ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
सदर घटनेचा पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहेत. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !