Tigerattack : वाघाच्या हल्ल्यात मोहफूले वेचण्यासाठी गेलेला इसम ठार!

0


NAGBHIR । 5 April 2023.
मोहफूल वेचण्यासाठी गावाजवळील जंगलात गेलेल्या इसमाला वाघाने ठार केल्याची दुर्घटना नागभीड तालुक्यातील तुकुम बिटामधील कक्ष क्रमांक ६०५ मध्ये काल (मंगळवारी) दुपारी दोन वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
अरूण महादेव रंदये (५६) असे मृत इसमाचे नाव असून तो नागभिड तालुक्यातील तुकूम येथील रहिवासी होता.


प्राप्त माहितीनुसार, अरुण रंधये हे काल (मंगळवारी) सकाळी गावानजीक असलेल्या जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेले होते. मोहफूल वेचत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने (tiger) त्यांच्यावर हल्ला (Attack) केला. या हल्ल्यात ते जागीच ठार झाले. 
बराच वेळ लोटूनही घरी परत न आल्याने कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी जंगलात जाऊन शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर लागलीच वनविभागाला याबाबत सुचना देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

मागील चार महिन्यात नागभीड (Nagbhir) तालुक्यात वाघांच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. १२ मार्च २०२३ रोजी नागभीडपासून जवळच असलेल्या शिवटेकडीजवळ वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मोहफूल वेचण्याचा हंगाम सुरू आहे. लवकरच तेंदूपत्ता संकलनाचे काम देखील सुरू होईल. त्यामुळे वनविभागाने अशा घटनांना आळा घालण्याची तातडीने पाऊल उचलावीत अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !